Video : उत्तर महाराष्ट्रसह कोकण, मुंबई, ठाणे पुण्याची आई 'घाटनदेवी'

Video : उत्तर महाराष्ट्रसह कोकण, मुंबई, ठाणे पुण्याची आई 'घाटनदेवी'

वाल्मिक गवांदे । इगतपुरी Igatpuri

आजपासून सर्वत्र मंदिरे उघडली आहेत. जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील घाटनदेवी मंदिरातही (Ghatandevi Temple) नवरात्र ऊत्सव (Navratrotsav) सुरु झाला आहे. आजपासून (दि. ७) ते १५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान नवरात्र, दुर्गापूजा, दसरा सण साजरा करण्यात येणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही अशा मार्गदर्शक सूचना तहसीलदार परमेश्वर कासुळे (Tahasildar Parmeshwar Kasule) यांनी दिल्या. तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोनामुळे फक्त दर्शन होणार असुन यात्रा भरविण्यात येणार नसल्याची माहिती तहसीलदार कासुळे यांनी दिली.

उत्तर महाराष्ट्र, मुंबई,ठाणे, पालघर, कोकण, नगर येथील भाविकांचे श्रद्धास्थान आणि इगतपुरी तालुक्याचे आराध्य दैवत श्री घाटनदेवी मंदिर येथील नवरात्र उत्सवयाची सर्वांनाच उत्सुकता असते.

वाघावर आरुढ असलेली घाटनदेवी माता प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देते. घाटनदेवी मातेची विविध रूपे आहेत. यातील पहिले रूप शैलपुत्री, म्हणजेच घाटनदेवी होय. प्राचीन माहितीनुसार देवी वज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे येण्यास निघाली त्यावेळेस रस्त्यात देवीने या ठिकाणी विश्रांती घेतली व ती येथेच स्थिर झाली. तीच ही घाटनदेवी होय, अशी देवीची आख्यायिका सांंगितली जाते.

मुंबईपासून दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसारा घाटात मुंबई-नाशिक महामार्गाजवळ नाशिक इगतपुरीच्या वेशीवर घाटन देवीचे मंदिर आहे. संकटकाळी भक्तांच्या हाकेला धाऊन जाणारी आणि विशेष म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून घाटनदेवीची महिमा असल्याची धारणा भाविकांमध्ये आहे.

महाराष्ट्राच्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यातील भाविकांची मंदिरात गर्दी होत आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील प्रवासीही या ठिकाणी थांबून देवीचे दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी निघताना दिसत आहेत

Related Stories

No stories found.