Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo Story : नाशिकचा बोटक्लब : ज्यासाठी गोव्यात जावे लागायचे, ते आता...

Video Story : नाशिकचा बोटक्लब : ज्यासाठी गोव्यात जावे लागायचे, ते आता नाशकात

नाशिक | प्रतिनिधी

पाण्यातील वेगवेगळे खेळ अनुभवण्यासाठी ज्या गोव्यात जावे लागत होते ते सर्व खेळ आता नाशिक आपल्या गंगापूर धरणात खेळता येणार आहेत. नाशिककरांचा प्रलंबित आणि महत्वाकांशी असलेला हा बोट प्रकल्प अखेर सुरु झाला आहे…

- Advertisement -

(व्हिडीओ स्टोरी : सतीश देवगिरे)

नव्या कोऱ्या विविध धाटणीच्या बोटी याठिकाणी दाखल झाल्या आहेत. नाशिकमधून खानदेशात पळवून नेलेल्या बोटीदेखील परत आणलेल्या आहेत. अतिशय प्रशस्त अशी बैठकव्यवस्था, सुरक्षेची पूर्णपणे हमी या तत्वावर हा बोट प्रकल्प महाराष्ट्रातील आदर्श आणि अनोखा ठरणार आहे.

याठिकाणी बम्पर राईड, बनाना राईडसदेखील होणार आहेत. लवकरच नाशिकमध्ये देशातील पहिले वाटर स्कुबा डायविंग सुरु होणार असल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली.

गंगापूर धरणातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. या बोटींपासून कुठल्याही पद्धतीने वायू प्रदूषण वा जलप्रदूषण होत नसल्याचे येथील नागरिक सांगतात.

ऑईल लिकेज झाल्यावर इंजिन आपोआप बंद पडते असे अत्याधुनिक प्रकारचे इंजिन या बोटींना बसवण्यात आले आहेत. नाशिकमध्ये बोटिंग क्लब सुरु झाल्यानंतर लहानग्यांपासून वयोवृद्ध बोटिंगचा आनंद लुटायला येत आहेत. बोटिंग झाल्यानंतर अरे वाह बढीया…मजा आ गया, खूप मज्जा आली, नाशिकची नवी ओळख नावारूपाला येणार अशाचा काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येथील पर्यटकांनी ‘देशदूत’कडे दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या