Video : अखेर शाळेची घंटा वाजली...!

पहा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद
Video : अखेर शाळेची घंटा वाजली...!

व्हिडिओ स्टोरी : सतीश देवगिरे, भारत पगारे

नाशिक । Nashik

करोना महामारीमुळे तब्बल अकरा महिन्यांपासून ‘लॉकडाऊन’ असलेल्या शाळांची घंटा अखेर आज वाजली. शहरासह जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरलेले असल्याने शाळांचा परिसर गजबजलेला दिसून आला.

दरम्यान नियमितपणे शाळा सुरु ठेवली जाणार नसून केवळ तीन तासांमध्ये इंग्रजी व गणित विषय शिकवले केले. शिक्षण विभागाने 10 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाच्या आधारे शाळांनी आवश्यक त्या उपाययोजना करुनच शाळा सुरु करण्यात आल्याचे दिसून आले.

तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमत्तीपत्र घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश देण्यात आला. शाळांची स्वच्छता, सॅनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पालन यावेळी करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com