Video : नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाण्याचा रुद्रावतार एकदा पाहाच...

निफाड/ करंजी खुर्द | Niphad / Karanji Khurd

नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याचे सहा गेट पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. एकून १६ हजार ५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या गोदावरीत होत आहे. नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे....

इगतपुरी, दिंडोरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरणात पाणी साठा वाढल्याने दारणा धरणातून 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरणातून दुपारी दोन वाजता ३ हजार ५०० विसर्ग होत आहे तर सायंकाळी चार नंतर ४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

तर कडवामधून २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून पालखेड धरणातून विसर्ग वाढवून १ हजार ३०० क्युसेक करण्यात आला आहे. हे सर्व पाणी नांदुर मध्यमेश्वर धरणात आल्याने या धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com