Wednesday, May 8, 2024
HomeUncategorizedVideo : डिजेच्या तालावर थिरकली तरूणाई

Video : डिजेच्या तालावर थिरकली तरूणाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या मार्चपासून प्रत्येक सण करोना संकटाच्या सावटा खाली गेला. यात गणेश उत्सवापासून ते दिवाळी सर्व लागोपाठ सर्व सणाचा समावेश आहे.

- Advertisement -

मात्र, गेल्या महिनाभरापासून करोनाचा कहर ओसरण्यास सुरूवात झाली असून यामुळे यंदाची मकर संक्रांत काही प्रमाणात मोकळ्या वातावरणात पारपडली. विशेष करून नगरमध्ये पतंगबाजीला संम्रिस प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यावेळी दरवर्षी प्रमाणे अनेक ठिकाणी तरूणाई डिजेच्या तालावर थिरकतांना दिसली.

करोना संकटाचे सावट आणि मनपा प्रशासनाने चिनी मांजा विक्री करणार्‍यांच्या आवळलेल्या मुसक्या यामुळे यंदाची नगरची नगरची पतंगबाजाला दरवर्षी प्रमाणे जोर नव्हता. मात्र, जुन्या शहरात, दिल्ली दरवाजा, पाईपलाईन उपनगर, गुलमोहर रोड, निर्मल नगर भागात अबालवृध्द आणि तरूण पतंगबाजी करतांना दिसले.

बाजारा यंदा कागदी आणि प्लाटिस्कचे विविध आकारातील पतंग विक्रीसाठी उपलब्ध होते. मात्र, चायना मांजा विरोधात मनपा आणि पोलीस प्रशासनाने मोहिम हाती घेतल्याने शहरातून काही प्रमाणात चायना मांजा हद्दपार झालेला दिसला. मात्र, असे असतांना बुधवारी मांजामुळे एकाचा गळा कापण्याची घटना घडलीच.

दरम्यान, काल सकाळीच सुवासिनी महिलांनी मकर संक्रातीच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त मंदिरात जावून पुजा केली. त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम होवून एकमेकींना शुभ प्रतीक असणारे संक्रातीच्या वाणनाचे वाटप केले. संक्रातीनिमित्त घरोघरी मिष्टान्नाचा बेत होता. नागरिकांनी एकमेेंकांना तिळगुळ वाटप करून शुभेच्या दिल्या. दुपारनंतर पुन्हा पतंगबाजीला उत आला. इमारतीच्या छतावर आणि मोकळ्या मैदानात नगरकरांनी पतंगबाजीचा आनंद घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या