Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : गोदावरी ब्युटीफिकेशनबाबत काय म्हणाले मनपा आयुक्त?

Video : गोदावरी ब्युटीफिकेशनबाबत काय म्हणाले मनपा आयुक्त?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नवनियुक्त मनपा आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी आज स्मार्ट सिटीच्या (Smart City) कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांना विविध सूचना देण्यात आल्या, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे (Sumant More) यांनी दिली.

- Advertisement -

मनपा आयुक्त रमेश पवार यांनी आज गोदावरी परिसर, रामकुंड, रोड नंबर ७५, ४०, २४, या रस्त्यांची पाहणी केली. गोदावरी ब्युटीफिकेशनचे (Godavari Beautification) काम धिम्या गतीने सुरु असून ते काम पावसाळ्याआधी पूर्ण करावे.

ज्या रोडवर अतिक्रमण असेल त्या रोडच्या बाबतीत विभागीय अधिकारी, उपायुक्त, अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्या मदतीने अतिक्रमण हटवून, ते डीपी रोडप्रमाणे विकसित करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

तसेच नदीत जे इतर कामे सुरु आहेत त्याबाबतही सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. महापालिकेने रोबोटच्या सहाय्याने जलपर्णी काढावी, अशी सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पवार यांनी दिली.

मनपा आयुक्तांचा आजचा पाहणी दौरा हा महापालिका अधिकारी आणि स्मार्ट सिटी अधिकारी यांच्यात समन्वय साधण्यासाठी महत्वाचा ठरेल, अशी आशा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी व्यक्त केली. पाहा व्हिडीओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या