आगार गजबजले; लालपऱ्या धावू लागल्या
व्हिडिओ स्टोरी

आगार गजबजले; लालपऱ्या धावू लागल्या

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

येवला | सुनील गायकवाड

गेल्या २१ मार्च पासून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लालपरीचे चाकेही थांबले होते. मात्र आज सदभावना दिन साजरा करून शपथ घेऊन लालपरी धावण्यास सुरुवात झाली असल्याने तब्बल १५० दिवसानंतर येवले बसस्थानक गजबजु लागले आहे.

एका बस मध्ये २२ प्रवाशी घेणार असले तरी आज एका एका बसमध्ये दहा - बारा प्रवाशांना घेऊनच या लालपरी ला धावावे लागले.

लालपरी तब्बल १५० दिवसानंतर सुरू झाली. त्यामुळे येवला बसस्थानकावर खड्डयांचे साम्राज्य असून रिपरीप सुरू असलेल्या पावसामुळे दलदल वाढलेली दिसली.

सर्व चालकांना यावेळी सूचना देण्यात आल्या की, बर्‍याच दिवसांनी राज्य परिवहन बसेस मार्गावर चालनात येणार असल्याने बस काळजी पुर्वक व वाहतूकीच्या नियमांचे पालन करून चालविण्यात याव्यात.

तसेच आंतरजिल्हा एसटी बस वाहतूक उद्यापासून आज (दि. २०) पासून सुरू झाली आहे. बसने प्रवासाकरिता कोविड टेस्टची गरज नाही, ई-पासची गरज नाही, वैद्यकीय दाखल्याची गरज नाही. चला महत्वाची कामे एसटीने प्रवास करुन पार पाडू या असे आगार व्यवस्थापक यांनी याप्रसंगी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com