Video : करोना दुसर्‍या लाटेची चर्चा, नियम पाळा - भुजबळ

देशदूत सामाजिक भान उपक्रम
Minister Chhagan Bhujbal
Minister Chhagan Bhujbal

नाशिक | प्रतिनिधी

वर्षभरापासून करोनाने जगाला हैराण केले आहे. यावर लसही तयार झाली परंतु ती २० कोटी लोकांपर्यंत पोहचेपर्यंत वेळ लागणार आहे. जिल्ह्यात करोनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. मृत्यूदरही कमी झाला...

यामुळे लोकांना वाटते करोना गेला. यामुळे सर्व गोष्टी सुरू करण्याची मागणी झाली ती शासनाने मान्य केली. दसरा - दिवाळीला नागरीकांनी बाजारपेठेत लाखोच्या संख्येने गर्दी केली. मास्कसह कोणतेही नियम पाळले नाहीत. परंतु करोना गेला नाही तर तो पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील.

जगातच नव्हे तर दिल्लीतही करोनाची दुसरी लाट धडकल्याची चर्चा आहे. आता माझे कुटुंब माझी जाबाबदारी याकडे लक्ष द्या, मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा, गरज असेल तरच घराबाहेर पडा सर्वांना हात जोडून विनंती आहे की, करोना संसर्गाचे सर्व नियम पाळा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com