Video : आनंदवलीच्या ‘त्या’ वादग्रस्त बांधकामाची महापौरांकडून पाहणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील दोन महिन्यांपासून चर्चेत असलेल्या आनंदवली (Anandwali) शिवारातील सर्वे क्रमांक 65 मध्ये गोदापात्रात सुरू असलेल्या वादग्रस्त बांधकामाची महापौर सतीश कुलकर्णी यांनी आज पाहणी केली...

काल झालेल्या महासभेत मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख (Salim Shaikh) यांनी याबाबत चौकशीची मागणी केली होती. सलीम शेख यांच्या मागणीला सेना गट नेते विलास शिंदे (Vilas Shinde), सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनीदेखील दुजोरा होता. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी अधिकारी व सदस्यांसह प्रत्यक्ष आज पाहणी दौरा केला.

यावेळी सलीम शेख म्हणाले की, या जागेचा प्रश्न सातत्याने लावून धरल्यामुळे आज महापौरांनाही याठिकाणी येऊन पाहणी करावी लागली. माझ्याकडे हा मोजणी नकाशा आहे. 14 गुंढे जागा ही गोदापार्कसाठी राखीव करण्यात आलेली आहे, मात्र प्रत्यक्ष जागेवर ही जागाच नसल्याचा दावा शेख यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होत आहे. एक अन एक जागेचा हिशोब आम्ही नगर रचना विभागाकडून घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान प्रशासनाने दोन दिवसांपुर्वीच संबधित बिल्डरला अंतिम नोटीस बजावली आहे. समाधानकारक उत्तर न आल्यास परवानगी रद्द करण्याची कारवाई होणार असल्याची माहिती नगररसचना विभागाचे अधिकारी सी. बी. आहेर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com