महिलांनी तब्बल ११ एकरात केली बाजार समिती स्थापन; पाहा व्हिडीओ

नाशिक | Nashik

कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) अभोणा (Abhona) येथे शिवसिद्ध गोविंद खाजगी कृषी उत्त्पन्न बाजार समिती (Shivsiddh Govind Private Agricultural Produce Market Committee) आहे. अभोण्यातील ही पहिली खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती असून ही बाजार समिती महिलांनी स्थापन केली आहे. त्यामुळे बाजार समिती जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे...

याबाबत बाजार समितीच्या अध्यक्ष संगीता बोरसे यांनी माहिती देतांना सांगितले की, अभोणा हा ग्रामीण भाग असल्याने या भागातील आदिवासी लोकांना रोजगार (Employment) उपलब्ध होईल या हेतूने बाजार समिती सुरु करण्यात आली. तसेच ११ एकरमध्ये बाजार समिती स्थापन करण्यात आली असून याठिकाणी ८ शेड आणि २० मशिन आहेत.

त्याचबरोबर बाजार समितीत १५ व्यापारी असून शेतकऱ्यांची (Farmers) संख्या दिवसाला ४०० ते ५०० इतकी असते. तसेच बाजार समितीत दिवसाला २ हजार ते साडेचार हजार क्विंटल माल (Goods) विक्रीसाठी येत असतो. याशिवाय बाजार समितीचे सर्व व्यवहार रोख पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्याने माल विकल्यानंतर त्याला लगेचच मालाचे पैसे दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्याचा चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पहायला मिळते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com