Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमहाशिवरात्री विशेष : डोंगरगणचा रामेश्वर

महाशिवरात्री विशेष : डोंगरगणचा रामेश्वर

अहमदनगर शहरापासून अवघ्या पंधरा-सोळा किलोमीटरवर गर्भगिरी डोंगराच्या पर्वत रांगेत डोंगरगण हे गाव वसलेले आहे.

याठिकाणी श्री रामेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी दर महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते. यासह या ठिकाणी सीताची न्हाणी हे ठिकाण प्रसिद्ध असून वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांचे वास्तव्य या ठिकाणी होते. येथे प्रभू रामचंद्र यांनीच या ठिकाणी श्री रामेश्वर महादेव यांची स्थापना केली असल्याची अख्यायिका आहे. हा परिसर निसर्ग रम्य असून श्रावण महिन्यात महिनाभर भाविकांची या ठिकाणी वर्दळ असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या