Friday, April 26, 2024
Homeनाशिकसदरक्षणाय खलनिग्रहनाय! पाहा दीक्षांत सोहळ्यातील संचलनाचा खास व्हिडीओ

सदरक्षणाय खलनिग्रहनाय! पाहा दीक्षांत सोहळ्यातील संचलनाचा खास व्हिडीओ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र पोलीस अकादमी (Maharashtra Police Academy), नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. ११९ व्या सत्राचा दीक्षांत संचलन (Passing Out Parade) समारंभ आयोजित करण्यात आला….

- Advertisement -

यावेळी महाराष्ट्रातील विविध भागांतून खातेअंतर्गत ३१० पुरुष व १२ महिला असे ३२२ उपनिरीक्षकांनी दीक्षांत समारंभात संचलन (Parade) केले. स्व. यशवंतराव चव्हाण वर्ल्ड कप बेस्ट ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅच आणि बेस्ट ट्रेनि ऑफ द बॅच सोर्ड ऑफ रिव्हॉलवर देऊन गणेश वसंत चव्हाण (Ganesh vasant Sawant) यांचा सत्कार करण्यात आला.

अहिल्याबाई होळकर कप बेस्ट ऑल राऊंड वुमन कॅडेट ऑफ द बॅच तेजश्री गौतम म्हैसाळे (Tejashree Gautam Mhaisale) यांना सन्मानित करण्यात आले. द्वितीय बेस्ट ट्रेनि ऑफ द बॅच म्हणून विशाल एकनाथ मिंढे (Vishal Eknath Mindhe) व बेस्ट कॅडेट इन स्टडीज सिल्वर बॅटेन पुरस्कार प्रतापसिंग नारायण डोंगरे (Pratapsingh Narayan Dongre) यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी गणेश सावंत म्हणाले की, मी शेतकरी कुटूंबातील असून सोलापूर जिल्ह्यातील आहे. अकादमीत आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचे ठरवले होते. त्यासाठी जिद्द, मेहनत घेतली. याआधी २००९ साली पोलिस दलात सहभागी झालो होतो. दोन वर्षे राज्य राखीव दलात व त्यानंतर २०११ पासून फोर्स वनमध्ये सेवा बजावली. २०१७ च्या खाते अंतर्गत परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर अधिकारी होण्याची स्वप्न पुर्ण झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या