
मुंबई | Mumbai
मुंबईतील चेंबूर येथील सुमन नगरमधील राहुलनगर नंबर दोनमधील SRS इमारतीसमोरील जमीन अचानक खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेचा भीतीदायक व्हिडीओ समोर आला आहे...
या घटनेनंतर येथील इमारत तात्काळ रिकामी करण्यात आली आहे. एसआरएस इमारतीमधील नागरिकांची सुमारे 40 ते 50 वाहने खड्ड्यात कोसळली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि मुंबई अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.