Video : वाघूर धरणाचे प्रथमच उघडले २० दरवाजे

Video : वाघूर धरणाचे प्रथमच उघडले २० दरवाजे

जळगाव | Jalgaon

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे (Heavy Rain) वाघूर धरणाचे (waghur dam) २० दरवाजे यंदा प्रथमच उघडण्यात आले. वाघूर नदीच्या उगमस्थली झालेल्या दमदार पावसामुळे वाघूर धरणात (Waghur Dam) पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी या धरणाचे प्रथम यंदाच्या पावसाळ्यात सर्व २० दरवाजे उघडण्यात आले. धरणातून ४९ हजार ६१८ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे....

वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने २८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याच्या विसर्गामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाघूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर धरण १०० टक्के भरले आहे.

Video : वाघूर धरणाचे प्रथमच उघडले २० दरवाजे
धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

Related Stories

No stories found.