Video : सातवाहनपासून ते चालुक्य काळातील दुर्मिळ नाण्यांचा ठेवा

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । Nashik

राष्ट्रीय मुद्रा परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दुर्मिळ नाणे संग्रहित करण्याचा छंद जोपासला असून त्यांच्या घरातील नाणे संग्रहालय हे नाशिकच्या पुरातन ठेव्यात भर घालत आहे.

या संग्रहालयात सातवाहन पूर्व काळातील अतिशय दुर्मिळ व प्राचीन नाणे असून त्यात यादव कालीन चलनातील नाण्यांचा देखील समावेश आहे. हे संग्रहालय इतिहास अभ्यासकांसाठी दुर्मिळ खजिनाच ठरत आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावले तर अनेक घराण्यांनी या ठिकाणी राज्य केले. येथील नद्याच्या काठावर अनेक मानवी संस्कृती फुलल्या व काळाच्या ओघात नामशेष झाल्या. त्यांनी मागे ठेवलेल्या पाऊलखुणा हा इतिहास प्रेमींसाठी कुतुहुलाचा विषय. त्यापैकी त्या काळातील चलन व दुर्मिळ नाणी हा चर्चेचा विषय ठरतो.

सराफा व्यावसायिक असलेले चेतन राजापूरकर यांनी ऐतिहासिक नाणी जतन करण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्या नाणे संग्रहालयात महाराष्ट्र विभागात मिळून येणारे ई स पूर्व.600 वर्ष ते 10 वे शतक या कालखंडातील नाण्यांचा समावेश आहे. त्यात कुंतल जनपद, सातवाहण पूर्व काळातील राजघराणे, सातवाहण,क्षत्रप,आभीर, ट्रेकुटक, कलचुरी, चालुक्य, राष्ट्रकूट व यादव घराणे काळातील अतिशय प्राचीन व दुर्मिळ नाण्यांचा ठेवा आहे.

तांबे, शिस, चांदी या धातुंची नाणी आहेत. त्याची दखल लंडन येथील जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व वंडर बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली व त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे हे संग्रहालय नाशिककर व इतिहास प्रेमींसाठी माहितीचा व अभ्यासाचा एक अनमोल ठेवा ठरत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *