Video : नाशकात भाजपचे अंतर्गत वाद; महापौर म्हणतात...

Video : नाशकात भाजपचे अंतर्गत वाद; महापौर म्हणतात...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आहे. मात्र, शहरात विकासकामे होत नाहीत. आरोग्याच्या समस्या संपत नाहीत असा आरोप लोकप्रतिनिधींनी करत सत्ताधारी भाजपचे आमदार आणि नगरसेवक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार देवयानी फरांदे म्हणतात की आरोग्य विभागाला टाळे ठोकणार, तर महिला आणि बालकल्याण सभापती म्हणतात की, कामे न झाल्यास आम्ही उपोषण करणार. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी फारूक पठाण यांनी महापौर सतीश कुलकर्णी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांच्याशी याबाबत चर्चा केली. यावर ते काय म्हणाले पाहूयात...

संवाद : फारूक पठाण, प्रतिनिधी नाशिक

व्हिडीओ : सतीश देवगिरे, नाशिक

Related Stories

No stories found.