धोडप किल्ल्यावर जाताय? आधी 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच...

नाशिक | देशदूत टीम | Nashik

जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात (Chandwad taluka) निसर्गाने संपन्न असलेले हट्टी (Hatti) हे गाव होय. या गावाजवळच धोडपचा किल्ला (Dhodap Fort) असून हा महाराष्ट्रातील (Maharashtra) किल्ल्यांमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्ला आहे.

धोडप किल्ला चांदवडच्या रांगेतील सर्वात उंच आणि महत्त्वाचा डोंगर असून हा शिवलिंगाप्रमाणे दिसणारा ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याची (Fort) उंची सुमारे १,५६६ मीटर म्हणजे ५,१४१ फूट इतकी असून किल्ल्यावरून २५ किल्ले दिसतात. तसेच किल्ल्यावर सुळका असून या सुळक्याच्या मागील बाजूस एक मोठी मानवनिर्मित गुहा व काही पाण्याच्या टाकी आहेत.

धोडप किल्ल्याला राघोबा दादा आणि पेशवे (Raghoba Dada and Peshwa) यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामुळे महत्वाचे स्थान आहे. या किल्ल्याच्या ठिकाणीच राघोबा दादा आणि पेशवे यांच्यात दिलजमाई झाली होती. त्यानंतर पुढे इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज (Briggs) यांनी मराठ्यांवर आक्रमण करून जिंकून घेतला.

याशिवाय किल्ल्याजवळ एक पर्यटन केंद्र (Tourist center) असून किल्ला बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून पर्यटकांना किल्ल्याबद्दलची माहिती पर्यटन केंद्रामार्फत दिली जाते. धोडप किल्ला ९४५ हेक्टर परिसरात असून कळवण, चांदवड आणि दिंडोरी अशा तीन तालुक्यांच्या क्षेत्रात पसरलेला आहे. तसेच या किल्ल्यावर ट्रेकरही चढाईसाठी येतात.

दरम्यान, धोडप किल्ल्यापासून चांदवड, इंद्राई, साडेतीन रोडगा, राजदेहेट, कांचन, मंचन, विखारा, कन्हेरा, खळ्याजवळ्या, सप्तशृंगी, अहीवंतगड, अचला अशी सातमाळा पाहायला मिळते. तसेच या किल्ल्याहून साल्हेर, सालोटा, चौल्हेरचे सुद्धा दर्शन होते. तर दक्षिणेकडील विस्तृत प्रदेश सुद्धा बघायला मिळतो.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com