Video धुळ्यात ओबीसींच्या घोषणांनी महामार्ग दणाणला

दोन्ही बाजूंनी वाहने खोळंबली
Video धुळ्यात ओबीसींच्या घोषणांनी महामार्ग दणाणला
धुळे महामार्गावरील खोळंबलेली वाहतुक

धुळे । Dhule

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समता परिषदेने आज धुळे शहरालगत नगाव बारी जवळ रास्ता रोखो आंदोलन केले. या वेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला, तर मुंबई आग्रा महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्यात.

समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ओबीसींच्या इतर संघटनाही सहभागी झाल्यात. या संघटनांचे पदाधिकारी गोपाल देवरे, सतीश महाले, बापू महाजन, आर के माळी, बापू खलाने, गणेश चौधरी, प्रा आण्णा माळी, ज्ञानेश्वर माळी, अश्फाक शेख, प्रा एस टी चौधरी, राजेंद्र बैरागी,राकेश बोरसे, आनंदा चौधरी, एकनाथ माळी यांच्यासह करकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com