Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedVideo Story : गोदापात्रातील सिमेंट भिंतीला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप

Video Story : गोदापात्रातील सिमेंट भिंतीला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप

नाशिक | प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालय आणि निरी संस्थेने गोदावरी नदी पात्रात सिमेंट बांधकाम करण्यास मज्जाव केलेला असतांना स्मार्ट सिटी कंपनीकडुन अहिल्यामाता होळकर पुलाखाली रामवाडी भागात नदीपात्रात सिमेंटची भिंत्त बांधण्यात येत आहे. यास शहरातील पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. हा प्रकार न्यायालयाचा अवमान असल्याचे सांगत ही भिंत्त काढुन गॅबियनची भिंत्त बांधण्याची मागणी करण्यात आली आहे…

- Advertisement -

यासंदर्भात गोदावरी प्रदुषणमुक्ती याचिकाकर्ते निशिकांत पगारे यांनी विभागिय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. अहिल्यामाता होळकर पुलाखाली बांधण्यात येत असलेल्या सिमेंटच्या भित्तीचे बांधकाम तात्काळ काढुन घेण्याची मागणी केली आहे.

गोदावरी गटारीकरण विरोधी मंच यांच्या वतीने उच्च न्यायालयात गोदावरी नदी प्रदूषण संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली असुन यात न्यायालयाने निळा व लाल पुर रेषेत कोणत्याही स्वरूपाच्या बांधकामास मनाई केली आहे.

असे असतांना या पुलाखाली सिमेंट कॉक्रीटच्या मदतीने नदीपात्रात भिंत्त बांधण्याचे काम सुरू असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. पगारे यांच्यानंतर गोदाप्रेमी देवांग जानी यांनी देखील यास विरोध केला आहे…

- Advertisment -

ताज्या बातम्या