अनधिकृत अतिक्रमणामुळे अंबड औद्योगिक वसाहत 'बकाल'

अनधिकृत अतिक्रमणामुळे अंबड औद्योगिक वसाहत 'बकाल'

सातपूर | रवींद्र केडिया

औद्योगिक वसाहतीतील साईड पट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात टपऱ्यांचे अतिक्रमण वाढू लागले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला काही अंशाने बकालपण आले आहे...

प्रशासन याबाबत दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांच्या मूळ हेतूबद्दल शंका येऊ लागली आहे. औद्योगिक क्षेत्रात 'कुणीही यावे टपरी लावून जावे' अशी स्थिती झाली आहे.

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या दंडेली मुळे टपली धारकांचे मनोबल वाढले आहे. त्याचवेळी प्रशासनाकडून बोटचेपे धोरण वापरले जात असल्याने या टप-यांमागे काही गौडबंगाल आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत मनपा प्रशासनाने हॉकर्स झोन निर्माण केले आहेत. हे झोन मात्र ओस पडले असले तरी इतरत्र मात्र टपरीच्या आडून अनेक उद्योग चालवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी उद्योजक करीत आहेत.

मध्यंतरी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंगळे यांनी एमआयडीसी व मनपाने संयुक्तपणे कारवाई करून या टपऱ्याचे अतिक्रमण हटविण्याची सूचना दिली होती. मात्र रस्त्यावर कारवाई झाली नसल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com