Monday, April 29, 2024
HomeनाशिकVideo : ममदापूर संवर्धन केंद्रात हरणांना कसे जोपासले जाते? जाणून घ्या व्हिडीओच्या...

Video : ममदापूर संवर्धन केंद्रात हरणांना कसे जोपासले जाते? जाणून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून

नाशिक | Nashik

येवला तालुक्यातील (Yeola Taluka) ममदापूर (Mamdapur) येथे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर हरीण संवर्धन केंद्र (Deer Conservation Centre) उभारण्यात आले आहे. या संवर्धन केंद्रात हरणांच्या खाण्याची आवडनिवड जोपासली जात असून याठिकाणच्या जैवविविधतेच्या रक्षणासाठी येथील व्यवस्थापनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत…

- Advertisement -

Video : ‘असे’ आहे ममदापूर येथील हरीण संवर्धन केंद्र; पाहा देशदूतचा खास Ground Report

याबाबत माहिती देतांना येथील कर्मचारी मच्छिंद्र ठाकरे म्हणाले की, ममदापूर हरीण संवर्धन केंद्रातील हरणांना त्यांच्या आवडीचे गवत (Grass) याच भागात मिळायला हवे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या गवताची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी सुरुवातीला गवताच्या बियांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये (Plastic Bags) रोऊन त्याची उगवण केली जाते. त्यानंतर योग्य ते व्यवस्थापन करून साधारण अडीच ते तीन महिन्यानंतर या गवताच्या लहान-लहान रोपांना मोकळ्या जागेवर टोकन केले जाते. यानंतर याठिकाणी वर्षभर गवत उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Video : मालेगावातील शेवगा पोहोचतोय परदेशात; पाहा देशदूतचा खास Ground Report

त्यासोबतच या केंद्रातील हरण, ससे, लांडगे, कोल्हे, अन्य पशु-पक्षी हे क्षेत्र सोडून दुसरीकडे जाऊ नये म्हणून त्यांच्या आवडीनिवडी देखील याठिकाणी जोपासल्या जातात. तसेच या संवर्धन केंद्रात नैसर्गिकरित्या डोंगरी गवत उगवलेले असतेच परंतु, मद्रास अंजन, दशरथ, बाजरा यासारख्या वेगवेगळ्या प्रजातींचे गवत याठिकाणी उगवले जाते. त्यामुळे येथील हरण आणि इतर पशु क्षेत्राच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत नाहीत, असे ठाकरे यांनी सांगितले.

Video : शेडनेटमध्ये रंगीत सिमला मिरचीची लागवड

- Advertisment -

ताज्या बातम्या