Video पद्‌मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना लिव्हिंग लिजेंड पुरस्कार तर सचिनदादा यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी बहाल

युरोपीयन इंटरनॅशनल युनिर्व्हसिटीने केला सन्मान, श्रीसदस्यांमध्ये आनंद
Video पद्‌मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना लिव्हिंग लिजेंड पुरस्कार तर सचिनदादा यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी बहाल

बँकॉक - Bangkok

रेवदंडा (Revdanda) येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे (Dr. Nanasaheb Dharmadhikari Pratishthan) अध्यक्ष तथा ज्येष्ठ निरूपणकार पद्‌मश्री आप्पासाहेब तथा डॉ.दत्तात्रय नारायण धर्माधिकारी (Dr. Dattatraya Narayan Dharmadhikari) यांना युरोपीयन इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी (European International University) तर्फे ‘लिव्हिंग लिजेंड’ पुरस्कार तर सचिनदादा धर्माधिकारी यांना ‘मानद डॉक्टरेट’ (Doctorate) ही पदवी प्रदान करण्यात आली. हा सोहळा बँकॉक (Bangkok) येथे आज दि.२५ रोजी पार पडला.

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग, जि.रायगड यांचे जगभरात लाख्खो श्रीसेवक आहेत. नानासाहेबांनी प्रसिध्दीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत घेतले व ते कायम सुरू ठेवले. हाच वसा त्यांचे चिरंजीव दत्तात्रय तथा पद्‌मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी व नातू डॉ.सचिनदादा यांनी सुध्दा नानासाहेबांनी सुरू केलेल्या कार्याला वाहुन घेतले आहे. आपले आजोबा आणि वडील यांच्याप्रमाणेच सचिनदादा सुध्दा समाजप्रबोधनाचे कार्य समर्थपणे करत आहेत. त्यांच्या या योगदानाचे महत्व ओळखून मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com