Video : उच्चशिक्षित तरुणाने शेती व्यवसायाला दिली पसंती

नाशिक | Nashik

पेठ तालुक्यात ( Peth Taluka) गावंधा पाडा (Gawandha pada) हे छोटेसे आदिवासी वस्ती (Tribal settlement)असलेले गाव होय. गावातील प्रमुख व्यवसाय हा शेती असून गावात हेमंत मोहन गावंडे हे तरुण शेतकरी आहेत...

गावंडे हे उच्चशिक्षित असून त्यांनी गावात येऊन त्यांचे चुलते यशवंत गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या वडिलोपार्जीत असलेल्या शेती (Agriculture) व्यवसायास पसंती दिली आहे.

गावंधा पाड्यात बऱ्यापैकी भात शेती (Rice Farming) असून येथील लोकांचे जीवन भात शेतीवरच अवलंबून आहे. तसेच या गावामध्ये ९० ते ९५ टक्के क्षेत्रावर भात शेती होत असून इतर क्षेत्रावर नागली, वरई आणि आंब्याची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय गावंधा पाड्यातील गावकऱ्यांनी (Villagers)एकत्र येत सन २०१९ साली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरु केली असून या कंपनीच्या माध्यमातून परीसरातील शेतकऱ्यांसाठी (Farmers)काम केले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com