Video : मुसळधार पावसात 'स्मार्ट' नाशिक तुंबले; रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप, दुचाकी गेल्या वाहून

नाशिक | प्रतिनिधी Nahsik

शहरात आज दुपारी ३० मिमी पावसाची नोंद झाली. धुव्वाधार पावसामुळे एकीकडे समाधान व्यक्त होत असतानाच नाशिकच्या बहुचर्चित स्मार्टरोडवर मात्र, चांगलीच तुंबई झालेले बघायला मिळाले. आपला आपला आधीचाच रस्ता चांगला होता असे म्हणत नाशिककरांनी स्मार्टरोडवर पुन्हा एकदा रोष व्यक्त केला.....

दुपारी आलेल्या पावसामुळे मेनरोड, पिंपळपार, कानडे मारुती लेनसह संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला होता. दुकानांच्या बाहेर लावलेल्या दुचाकी या पावसात वाहून गेल्या. अनेक वाहने पाण्याखाली गेली. पाऊस उघडेपर्यंत येथील नागरिकांना सक्तीचा आडोसा घ्यायला लागला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com