Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमुंबईत पावसाचा हाहाकार; पाणी तुंबले

मुंबईत पावसाचा हाहाकार; पाणी तुंबले

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने मुंबईत दाणादाण उडवून दिली आहे.

- Advertisement -

मुंबईच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. तर ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे या पावसाळ्यात पहिल्यांदाच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

दादर, हिंदमाता भागात तळे साठले आहे. CSMT ते कुर्ला रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने वाशीकडे आणि कल्याणकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूकही बंद आहे.

दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी झाडे कोसळल्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे. मुंबई हायकोर्टाबाहेरही झाडे उन्मळून पडली आहेत.

पुढील ७२ तासांसाठी मुंबईत हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावचा तडाखा बसण्याचा अंदाज वर्तविला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या