Monday, April 29, 2024
HomeUncategorizedVideo हनुमान जयंती विशेष : भद्रा मारूती दर्शन

Video हनुमान जयंती विशेष : भद्रा मारूती दर्शन

खुलताबाद-रत्नापूर Aurangabad

खुलताबाद हे महाराष्ट्र राज्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव असून भद्रा मारुती या धार्मिक स्थळाने सर्वांना परीचीत आहे. हे गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण, या गावाला ‘रत्‍नापूर’ नावाने देखील ओळखले जाते.

- Advertisement -

भद्रा मारूती ह्या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. खुलताबाद येथे दरवर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक औरंगाबाद व आसपासच्या गावातून पायी चालत येतात. मात्र यावर्षी सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने सर्व यात्रोत्सवांवर बंदी असल्याने व गर्दी टाळण्यासाठी मंदिरे बंद आहेत, त्यासाठी प्रत्येकाला दर्शन व्हावे यासाठीच हा प्रयत्न…!

- Advertisment -

ताज्या बातम्या