Video गुढीपूजन, उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन नव वर्षाची सुरुवात

Video गुढीपूजन, उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन नव वर्षाची सुरुवात

जळगाव - jalgaon

पहाटेच्या मंगल वातावरणात सुवासिनींनी केलेले (Gudi Pujan) गुढीपूजन व त्याचसोबत मान्यवरांनी उगवत्या सूर्याला दिलेले अर्घ्य व मंचानवरुन साधकांनी सुरेल सादर केलेली लता मंगेशकरांची गाजलेली गीते (Lata Mangeshkar) अशा प्रसन्न मुहुर्तावर (Sanskarbharati) संस्कारभारतीची गुढीपाडवा पहाट साजरी झाली.

म.न.पा.प्रांगणातील कार्यक्रमाची सुरुवात "ओम नमोजी आदया या संत ज्ञानेश्वरांच्या रचनेने झाली तर जयोस्तुते श्री महन्मंगले या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.

भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांची गाजलेली गीते हे या कार्यक्रमाचे आकर्षण होते.

कार्यक्रमात सहभागी असलेले कलासाधक संपदा छापेकर, स्वाती डहाळे, अथर्व मुंडले, निळकंठ कासार, दिलीप चौधरी (तबला), राजेंद्र माने (संवादिनी), गिरीष मोघे (तबला) यांनी सुरेल गीते सादर केली अभ्यासपूर्ण निवेदन वैदेही नाखरे यांनी केले कथक कला मंदीरच्या रमा करजगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कारभारती गीत, आज गोकुळात रंग या गीतांवर रसिका ढेपे, निधी गायकवाड, विप्रा तळेले, सानिका शेठ, मिताली सपकाळे, स्तुती (शमा समृध्दी ब्राम्हणे देवश्री पाटील, कुंतल वाघमारे, अनुष्का पोतदार, युक्ता नाईक, श्रावणी बावसकर यांनी सामुहीक नृत्य केले.

गुढीपूजन प्रसंगी (Mayor Jayashreetai Mahajan) महापौर जयश्रीताई महाजन, मायाताई धुप्पड (जेष्ठ साहीत्यीका), गीता रावतोळे रेखाताई लढे, सुनंदा सुर्वे, कल्पना नेवे, रमा करजगांवकर, अर्घ्यदान करणारे मान्यवर - कुलभुषण पाटील (उपमहापौर ), अनील अभ्यंकर, मोहन रावतोळे, डॉ.सुभाष महाले, डॉ.पुरुषोत्तम पाटील, चिंतामण पाटील, सुहास देशपांडे, किशोर सर्वे, प्रमोद जोशी, दुश्यंत जोशी, अय मंत्र-संयुक्ता बयाणी, गीते व गायक-ओम नमोजी आदया, मोगरा फुलला, विठठल तो आला.

जिवनात ही घडी, वारा गाई गाणे (संपदा छापेकर जेथे जातो तेथे,अरे अरे ज्ञाना (स्वाती डहाळे) गगन सदन भय इथले संपत नाही-अथर्व मंडले. रुणझण रे अमरा, (निळकंठ कासार)मी डोलकर दर्याचा राजा (दिलीप चौधरी), संधीकाली या अशा (राजेंद्र माने), ने मजसी ने, जयोस्तुते, गुढी गीत (समुहगान) गायीले.

Related Stories

No stories found.