व्हिडिओ स्टोरी
Video : निर्बंधमुक्त गुढीपाडव्याचा उत्साह; काय आहे नाशिकमधील माहोल?
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे (Corona) अनेक निर्बंध लावण्यात आले होते. यंदा राज्यातील करोनाबाबत सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. यामुळे नाशिक शहरात सकाळपासूनच गुढीपाडवा (Gudi Padwa) सणाचा उत्साह दिसून येत आहे...
नाशकात ठिकठिकाणी गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचे (Shobhayatra) आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी लेझीम, तलवारबाजीचे कार्यक्रम होत आहे. नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा धारण केल्या आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमही गुढीपाडव्याच्या निमित्ताने पार पडत आहेत. ढोल ताशांच्या गजरात नववर्षाचे उत्साहात स्वागत नाशिककरांनी केले आहे. पाहा व्हिडीओ....