Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : वयोवृद्धांसाठी 'ते' दाम्पत्य बनलं आधारवड; पाहा देशदूतचा खास ग्राऊंड रिपोर्ट

Video : वयोवृद्धांसाठी ‘ते’ दाम्पत्य बनलं आधारवड; पाहा देशदूतचा खास ग्राऊंड रिपोर्ट

नाशिक | Nashik

जीवनात अपार कष्ट सोसल्यानंतर आयुष्याचा उत्तराधार्थ सुखात जावा ही अपेक्षा वृद्ध बाळगून असतात. मात्र, यात अनेकांच्या वाट्याला निराशाच येते. काही वृद्ध आई-वडिलांना मुले सांभाळण्यास तयार नसतात. तर काहींना घरातून काढून दिल्याने ते निराश होतात.

- Advertisement -

अशातच आता या वयोवृद्धांसाठी नांदुरी (Nanduri) येथील ‘सप्तशृंगी वृद्धाश्रम (Saptshringi Old Age Home ) आधार बनले आहे. या आश्रमात राहणाऱ्या वयोवृद्ध लोकांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसून गंगाधर पगार आणि सरिता पगार (Gangadhar Pagar and Sarita Pagar) हे दाम्पत्य आश्रम चालवत आहेत.

याबाबत अधिक माहिती देतांना गंगाधर पगार यांनी सांगितले की, माझ्या आईच्या (Mother) एका मैत्रिणीला तिच्या मुलांनी घरातून काढून दिल्याने तिने नदीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केली.

त्यावेळी मला आईने सांगितले की, जी मुले आई-वडिलांना सांभाळत नाही त्यांच्यासाठी एक घर बनव. पंरतु,आई अशिक्षित असल्याने तिला वृद्धाश्रमाबद्दल काहिही माहिती नव्हते. त्यानंतर आईच्या बोलल्याने प्रेरित होऊन २०१८ साली सप्तशृंगी वृद्धाश्रम व अनाथाश्रम निर्माण केले.

दरम्यान, हे वृद्धाश्रम सुरु करतांना पगार यांना सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पंरतु, यावर त्यांनी यशस्वीपणे मात करत पुढे वृद्धाश्रम चालू केले. सध्या या आश्रमात ३५ लोक असून त्यांच्या जेवण, औषधासह, कपड्यांपर्यंत सर्व खर्च पगार दाम्पत्य करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या