Ground Report : निसर्गाच्या भरवशावर कोथिंबीरीचे पीक; पाहा सिन्नरच्या शेतकऱ्याची व्यथा

नाशिक | Nashik

सिन्नर तालुक्यात (Sinner Taluka) पाडळी (Padali) हे गाव असून या गावातील शेतकरी सुनील रेवगडे (Farmer Sunil Revgade) यांच्या कुटुंबाची जंगलाच्या बाजूला शेती (Agriculture) आहे. या शेतीत त्यांनी सध्या कोथिंबीरीचे ( Coriander) पिक घेतले आहे. रेवगडे यांनी आपल्या दोन एकर शेतीमध्ये ७ सप्टेंबरला कोथिंबीरीची लागवड केली...

काही दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस (Rain) झाला होता. त्याचा फटका इतर पिकांसोबतच कोथिंबीरीला बसला आहे. मुसळधार पाऊस झाल्यामुळे रेवगडे यांना सारख्या फवारण्या कराव्या लागल्या. तसेच कोथिंबीरीला दोन दिवसाआड फवारणी करावी लागते. जास्त पाऊस झाल्यामुळे कोथिंबीरीवर करपा रोग जातो. त्यामुळे बाजारात (Market) कोथिंबीरीला भाव मिळत नाही.

तसेच कोथिंबीर काढायला आल्यानंतर साधारणता १० हजारांच्या आसपास जुड्या बनवून नाशिकला (Nashik) बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. परंतु सध्या सिन्नर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेवगडे यांचे मुळ भांडवल निघणेही अवघड झाले आहे. त्यामुळे निसर्गाने जर साथ दिली तर भांडवली खर्चासह अधिक नफा मिळेल अशी अपेक्षा रेवगडे कुटुंबाने व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com