Ground Report : 'गोगुळ' एक दुर्लक्षित गाव; 'पाहा' व्हिडीओ...

नाशिक | Nashik

सुरगाणा तालुक्यातील गोगुळ गावाजवळ मांजरपाड्याचा प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम २०१० पासून सुरु आहे. या गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पात गेली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी प्रकल्पात गेल्या आहेत त्यांना अजूनही याचा मोबदला मिळणे बाकी आहे.

मांजरपाडा प्रकल्पाचा उद्देश एवढाच आहे की, प्रकाल्पलगतच्या गोगुळसह छोट्या-मोठ्या गावांना पाण्याची सोय व्हावी. मात्र अजूनही गोगुळ गाव पाण्यासह इतर सुख सुविधांपासून अलिप्तच आहे.

या गावाजवळ एका रस्त्याचे काम होत असून गेल्या वर्षभरापासून हे काम बंद आहे. मात्र याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दगडाचा भराव करून हा रस्ता पुढे पुलाला जोडून गोगुळगावात नेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

पावसाळ्यात याठिकाणी पाणी वाढले की या गावचा रस्ता बंद होऊन जगाशी संपर्क तुटतो. तर छोटीशी वस्ती असलेल्या गोगुळ या गावचे आरोग्य केंद्र साधारणतः २५ किलोमीटरवर असलेल्या बोरगाव येथे आहे.

येथील ग्रामस्थ सांगतात की, काही दिवसांपूर्वी एक आजीबाई आजारी असताना पावसामुळे पाणी साचल्याने नातेवाईकांना रस्ता ओलांडता आला नाही. रस्ता शोधून गावाच्या पलीकडून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत त्या आजीबाईंनी आपले प्राण सोडले होते.

रस्ता नसल्यामुळे अशा घटना याठिकाणी वारंवार घडत आहे. मांजरपाड्याचा पूल जर का तयार झाला तर या गावकऱ्यांची हा पुल वरदानच ठरणार आहे. या पुलाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com