Sunday, May 5, 2024
Homeनाशिककळवणला उभारणार भव्य शिवस्मारक; पाहा व्हिडीओ

कळवणला उभारणार भव्य शिवस्मारक; पाहा व्हिडीओ

नाशिक | Nashik

शहरापासून सुमारे ९० किलोमीटरवर कळवण तालुका (Kalwan Taluka) असून या भागात प्रामुख्याने कांदा (Onion) ऊस (Sugarcane) मका (Maize) ही पिके घेतली जातात. सध्या तालुक्यात विविध ठिकाणी विकासकामे सुरु असून आता नव्याने या परिसरात शिवस्मारक (Shiva Memorial) उभारण्यात येणार आहे…

- Advertisement -

याबाबत राष्ट्रवादीचे (NCP) कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे (Rajendra Bhamre) यांनी माहिती देतांना सांगितले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे आपल्या सर्वांचे दैवत असून कळवण शहरात किंवा तालुक्यात एकाही ठिकाणी शिवाजी महाराजांची मूर्ती नव्हती. त्यामुळे कळवणचे युवा नेते भुषण पगार यांनी स्मारक उभारण्याची संकल्पना प्रथम मांडली.

त्यानंतर सर्वांनी एकत्र येत शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन लोकवर्गणी व नगरपंचायतीच्या माध्यमातून दसऱ्याच्या दिवशी १७१ फुटी ध्वज उभा केला. यानंतर मूर्तिकार राम सुतार (Sculptor Ram Sutar) यांच्याकडे शिवाजी महाराजांचा आश्वावारूढ पुतळा (Statue) बनविण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत या पुतळ्याचे अनावरण करण्याचा मानस असल्याचे भामरे म्हणाले.

यासोबतच कळवण परिसरात (Kalwan Area) किल्ले, पर्वतरांगा, देवी-देवतांची मंदिरे असल्याने पर्यटन विकासाला (Tourism Development) चालना मिळत असून परिसरातील नागरिकांना रोजगार (Employment) उपलब्ध होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या