Wednesday, April 24, 2024
Homeनगरग्रामपंचायत निवडणुक : उमेदवारांची लगीनघाई, नेवासा तहसील कार्यालयात गर्दी

ग्रामपंचायत निवडणुक : उमेदवारांची लगीनघाई, नेवासा तहसील कार्यालयात गर्दी

नेवासा । तालुका वार्ताहर । Newasa

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज शेवटचा दिवस आहे.

- Advertisement -

१५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांची अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात हाऊसफुल गर्दी पहावयास मिळाली आहे. निवडणूक लढवण्यासाठी-गडाख-मुरकुटे-घुले -शिवसेना यासह अनेक गटातील इच्छुकांनी निवडणूक लढविण्यासाठी जणू गुढग्याला बाशिंग बांधल्याचे दिसत आहे. होऊ घातलेल्या ५९ ग्रामपंचायती पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्लुप्त्या लढवतांना दिसत आहे तर अनेक ठिकाणी जिरवाजीरवीचे राजकारण आत्तापासूनच सुरू आहे. काल 534 अर्ज दाखल झाले होते आज शेवटचा दिवस असल्याने विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या