Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या...अन् राज्यपाल कोश्यारींनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका, पाहा व्हिडीओ

…अन् राज्यपाल कोश्यारींनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका, पाहा व्हिडीओ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाशिक शहरातील ईदगाह मैदानावर आदिवासी जनजातीय गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी उपस्थिती लावत आदिवासी नृत्यावर ठेका धरला….

- Advertisement -

यावेळी मंत्री विजयकुमार गावित आणि नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनीही त्यांच्यासोबत नृत्याचा आनंद लुटला.

कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खा. हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात होळी नृत्य, लग्नातील पारंपरिक आदिवासी नृत्य, ढोल नृत्य, पारंपरिक आदिवासी नृत्याद्वारे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. यावेळी राज्यपालांनी राज्यभरातून आलेल्या कलापथकांचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या