व्हिडीओ स्टोरी : स्वच्छता गोदामाईची

प्रतिनिधी : भारत पगारे, देशदूत नाशिक

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

नाशिक | प्रतिनिधी

शहरातील नाशिक प्लाॅगर्सच्या ५० हून अधिक सदस्यांनी ५ डिसेंबर अर्थात आंतरराष्ट्रीय व्हाँलेंटीयर दिनाचे आैचित्य साधून संपूर्ण गाेदाघाटाची स्वच्छता करून पर्यावरण स्वच्छतेचा आणि सुरक्षिततेचा आगळावेगळा संदेश दिला.

यावेळी नमामि गाेदा फाउंडेशनचे राजेश पंडित यांनी सदस्यांना मार्गदर्शन केले. या माेहिमेत सहभागी सदस्यांनी रामकुंड, गाेदाघाट, गाडगे महाराज पूल व आजूबाजूच्या ठिकाणी पात्रातील कचरा, प्लास्टिक, अविघटनशील पदार्थ आणि निर्माल्य बाहेर काढले.

या माेहिमेत अभिनेते किरण भालेराव, अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर यांच्यासह तेजस तलवारे आदींसह सदस्य सहभागी झाले हाेते.

यावेळी नमामि गाेदा फाउंडेशनच्यावतीने सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र देऊन गाैरविण्यात आले.