Video : गोदावरी एक्स्प्रेस बंद; चाकरमान्यांकडून प्रातिनिधिक बोगीत गणेशोत्सव

Video : गोदावरी एक्स्प्रेस बंद; चाकरमान्यांकडून प्रातिनिधिक बोगीत गणेशोत्सव

मनमाड | Manmad

मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस (Manmad Kurla Godavari Express) बंद असल्याने चाकर मान्यांनी यार्ड मध्ये एका डब्यात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्यासाठीच साकडे घातले...

कोरोनामुळे मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस बंद असल्यामुळे चाकरमान्यांनी लोको शेडच्या यार्ड मध्ये एका डब्यात गणरायाची मूर्तीची प्रतिष्ठापना (Ganeshotsav 2021) केली आहे. रेल्वे प्रशासनाने विशेष परवानगी दिल्यामुळे गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत आज विधिवत पूजा करून विघ्नहर्ताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

गेल्या 25 वर्षा पासून चाकरमाने गोदावरी एक्स्प्रेसच्या पास बोगीत गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहेत.

मात्र, कोरोनामुळे गोदावरी एक्स्प्रेस बंद असल्याने गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी असा प्रश्न चाकरमान्यांना पडला होता.

अखेर त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे यार्ड मध्ये उभी असलेली गोदावरी एक्स्प्रेसच्या पास बोगीत गणपतीच्या मुर्तीची प्रतिष्ठपणा करण्याची परवानगी मागितली रेल्वे प्रशासनाने त्यांना पार्सल बोगी उपलब्ध करून दिल्यानंतर यार्ड मध्ये श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

त्यासाठी डब्यात आकर्षक सजावट करण्यात आली असून कोरोनाचे संकट दूर करून गोदावरी एक्स्प्रेस लवकर सुरू करण्यासाठी चाकर मान्यांनी बाप्पाला साकडे घातले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com