Video : गुलाबी थंडीत रंगणारी गावरान 'हुर्डा पार्टी'
नाशिक । रवींद्र केडीया | Nashik
बोचणारी गुलाबी थंडी (Cold) त्यात शेकोटीची उबदार हवा. याबरोबरच कोवळ्या ज्वारीच्या कणसांना भाजून तिखट चटण्यांसोबत त्याचा आस्वाद घेण्यात एक वेगळाच आनंद असतो. या निमित्ताने नाशकात विविध ठिकाणी 'हुर्डा पार्टी' चे (Hurda party) आयोजन करण्यात येत आहे...
या हुर्डा पार्टीमध्ये ज्वारीची कोवळी कणसे, दही, शेव, विविध चटण्या, दही शेव, यांचा मेळ करून खाण्यासोबत गावरान गोडी शेव, भाजलेल्या विविध शेंगा, बोर, आवळा, चिंच यांचा आस्वाद घेता येतो. तसेच जेवणासाठी गावरान पिठले, शिंगोळे, शेवभाजी, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, खापराचे मांडे, गुळाची जिलेबी, अशा अनेक विविध खाद्यपदार्थांच्या (Food) रेलचेलीत संध्याकाळचा वेळ घालवणे म्हणजे 'हुर्डा पार्टी'चा खरा आनंद होईल.
दरम्यान, यासोबतच अनेक ठिकाणी बैलगाड्या संबळ वादन, शिवरायांच्या काळातील साईन लँग्वेज, झोपडी, शेकोटी, गावरान वातावरण अशा अनेक कलांमधून हुर्डा पार्टी साजरी केली जाते. सध्या सुरू असलेल्या थंडीच्या गुलाबी गारठ्यामध्ये सर्वत्र 'हुर्डा' खाण्याच्या आनंदाचा जल्लोष दिसून येतो.