Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : पिंपळगाव बसवंतला गॅस वेल्डिंग सिलिंडरचा स्फोट; दोन गंभीर

Video : पिंपळगाव बसवंतला गॅस वेल्डिंग सिलिंडरचा स्फोट; दोन गंभीर

पिंपळगाव बसवंत | Pimpalgaon Baswant

येथील जुना आग्रा रोडवरील एसटी डेपो परिसरात असलेल्या नेत्र लक्ष्मी हॉस्पिटलजवळील विधाते गॅस वेल्डिंग वर्कमध्ये वेल्डिंग करणाऱ्या गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत परिसरातील जुना आग्रा रोडवरील नेत्र लक्ष्मी रुग्णालयाजवळ विधाते यांचे गॅस वेल्डिंग वर्कचे दुकान आहे. दुपारी दोनच्या सुमारास वेल्डींगचे काम सुरू असताना उन्हाच्या तीव्र उष्णतेने गॅस टाकीचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नाशकात मनसेला मोठा धक्का! दिलीप दातीर यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा

गंभीर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या उन्हाची तीव्रता जास्त आहे. अशा परिस्थितीत सदर घटना घडल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik : अल्पवयीन विद्यार्थिनीवर वसतीगृहात अत्याचार; दोन अधीक्षक निलंबित

- Advertisment -

ताज्या बातम्या