Video : गणरायासाठी काहीही; त्यांनी घरातच साकारले आकाश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इंदिरानगर (Indiranagar) येथील वडाळा पाथर्डी रोडवर आलेल्या गणेश सिग्नेटिया सोसायटीमध्ये अंतरा (Antara Dhatrak) आणि निषाद किरण धात्रक (Nishad Dhatrak) या भावंडांनी आकाशात विराजमान झालेला बाप्पा (God Ganesha) अशी आरास आपल्या लाडक्या बाप्पासाठी केलेली आहे...

कापूस आणि स्पंज यांचा वापर करत या धात्रक भावंडांनी सुबक मूर्ती भोवती आरास केलेली आहे. नियोजनबद्ध असलेल्या प्रकाशझोतांमुळे ही संपूर्ण आरास बघताना मंत्रमुग्ध करत आहे.

तारे, तारका, विजेच्या प्रकाशाच्या माळा यांचा नियोजनबद्ध वापर या आरासमध्ये दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले किरण धात्रक आणि आई आरती धात्रक यांनी अंतरा आणि निषाद यांना मदत केलेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com