Video तरुणांनी उभी केली नि:शुल्क रक्तदान चळवळ

धुळ्यातील तरुणांची राज्यभर दखल, थॅलेसिमियाचे 150 रुग्ण घेतले दत्तक
Video तरुणांनी उभी केली नि:शुल्क रक्तदान चळवळ

धुळे । प्रतिनिधी Dhule

येथील तरुणांनी सामाजिक बांधिलकीतुन ‘श्री दीप रक्त सेवा ग्रुप’ माध्यमातून उभ्या केलेल्या रक्तदान चळवळीला पाहता पाहता 10 वर्ष झालीत. या कालावधीत त्यांनी गरजू रुग्णांना आतापर्यंत 6 ते 7 हजार रक्त बाटल्या दिल्या आहेत. कोणतेही शुल्क न घेता गरजू रुग्णांना सेवा देणाऱ्या तरुणांचा मोठा ग्रुप असून अहोरात्र त्यांची सेवा सुरू आहे

थॅलेसिमिया या आजाराच्या रुग्णांना सतत रक्ताची गरज भासते. अशा 150 मुलांना या ग्रुप ने दत्तक घेतले असून त्यांना दर 24- 25 दिवसात मोफत रक्त पुरवठा केला जातो. कोरोनाच्या संकटात मागील वर्षी या ग्रुपने 1329 बाटल्या उपलब्ध करून दिल्यात, तर यंदा आता पर्यंत साडे पाचशे बाटल्या गरजवंतांपर्यंत पोहचवल्या आहेत. कोणतीही सामाजिक , राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या तरुणांच्या कार्याचा सुगन्ध आता राज्यभर पोहचला आहे. आज जागतिक रक्त दिनाच्या शुभेच्छा देतानाच रक्तदानासाठी इतरांनीही पुढे यावे, असे आवाहन या ग्रुपचे सदस्य कल्पेश दीपक शर्मा यांनी ' दैनिक देशदूत' शी बोलताना केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com