Video जळगावात चारचाकी वाहनांनी केली आत्महत्या!

जळगाव जिल्हा युवक काँग्रेसने त्या वाहनांनवर केला अंत्यसंस्कार

जळगाव - jalgaon

पेट्रोल-डिझेल-गॅसच्या (Petrol-diesel-gas) रोजच्या दरवाढीमुळे वाहनांनी फाशी घेऊन केली आत्महत्या... तर जळगाव जिल्हा युवक काँग्रेसने (District Youth Congress) त्या वाहनांनवर अंत्यसंस्कार करून आगळ्या वेगळ्या पध्दतीने केला मोदी सरकारचा निषेध..... महंगाई की मार जनता में मचा हाहाकार..! पुंजीपती मित्रो के लिए जनता को लूट रही मोदी सरकार..!!

पेट्रोल-डिझेल दरवाढ न थांबल्यास पेट्रोल पंपा (Petrol pump) वरील मोदींच्या बॅनरर्सला काळे फसण्यात येईल जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे (Devendra Marathe) यांनी इशारा दिला.

मागील 8 दिवसात पेट्रोल, डिझेल 5.90 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे तर एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. काही ठिकाणी एलपीजी सिलिंडर १००० ते ११०० रुपये एवढ्या किमतीला घ्यावा लागत आहे. सीएनजी, पीएनजी गॅस (CNG, PNG gas) तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून आजपासून औषधांचे दरही वाढणार आहेत.

आंदोलन प्रसंगी जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगरध्यक्ष मुजीब पटेल, सरचिटणीस डॉ.शोएब पटेल, प्रदेश सचिव बाबा देशमुख, जळगाव तालुक्याचे युवनेते मुरली सपकाळे, मकसूद पटेल, हर्षल दाणी, फैजन शहा, सारफराज शहा, दीपक कोळी, युसूफ खान, फज्जू शेख, अनिल सोळंखी, झाकीर बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.