Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo: नाशिकमधील न्यायालयाच्या इमारतीस आग

Video: नाशिकमधील न्यायालयाच्या इमारतीस आग

नाशिक l Nashik

जिल्हा न्यायालयातील काेर्ट नंबर २ जवळील रेकाॅर्ड रुमला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहचले आहे. त्यांच्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

- Advertisement -

जिल्हा न्यायालयात न्यायाधीश निकम यांचे न्यायालय आहे. त्यास गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. आगीमुळे न्यायालयातून धूर निघू लागला. तातडीने अग्निशमन दलास या घटनेची माहिती देण्यात आली.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. आगीत कसले नुकसान झाले किंवा आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळाली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या