Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : १३ दिवस उलटूनही आंदोलन सुरूच; सहाय्यक निबंधकांसमोर शेतकरी आक्रमक

Video : १३ दिवस उलटूनही आंदोलन सुरूच; सहाय्यक निबंधकांसमोर शेतकरी आक्रमक

निफाड | प्रतिनिधी | Niphad

जिल्हा बँक (NDCC Bank) सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचे काम करीत आहे. त्या विरोधात शेतकरी संघर्ष संघटना व शेतकरी समन्वय समितीच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे….

- Advertisement -

१३ दिवस उलटूनही सहाय्यक निबंधक आंदोलनस्थळी फिरकले नाही. लाच प्रकरणात अटक करण्यात आलेले रणजित पाटील यांच्या जागेवर नांदगावचे सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने प्रभारी अधिकारी आहेत.

Nashik : अल्पवयीन विद्यार्थिनीवर वसतीगृहात अत्याचार; दोन अधीक्षक निलंबित

मंगळवारी (दि. १८) सहाय्यक निबंधक भेट देण्यासाठी येणार म्हणून आंदोलक प्रतीक्षा करीत होते. दुपारी दोनच्या सुमारास सहाय्यक निबंधक विघ्ने तहसील कार्यालयासमोर दाखल झाले. ते थेट तहसीलदार शरद घोरपडे यांच्या दालनात चर्चा करण्यासाठी गेले. जोपर्यंत ठोस अथवा लेखी आश्वासन दिल्याशिवाय शेतकरी आंदोलन मागे घेणार नाही, असे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगताच सहाय्यक निबंधक शेतकऱ्यांना सामोरे गेले.

‘र’ प्रमाणपत्रानुसार कारवाई झाल्यानंतर ती कारवाई मागे घेण्याचे अधिकार आम्हाला नाही. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरच मार्ग निघेल, असे उत्तर सहाय्यक निबंधक विघ्ने यांनी दिले. मात्र, यापुढे अशा प्रकरणांमध्ये काळजी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सुप्रिया सुळे म्हणतात, १५ दिवसांत दिल्ली अन् महाराष्ट्रात दोन राजकीय स्फोट…

त्यावर जेव्हा शेतकरी कर्ज भरतील त्यावेळी बँकेचे नाव कमी करण्यासाठी तो खर्च शेतकऱ्यांच्या नावे टाकू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली. नाबार्डने कर्ज बँकेला दिले आहे आणि बँकेने सोसायटीला दिले आहे. मात्र, शेतकऱ्याचे कर्ज वसूल करण्याचा अधिकार सोसायटी संचालकांना न देता बँक करते, असे का, असा प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या