Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedVideo लसीकरणासाठी तोबा गर्दी : सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

Video लसीकरणासाठी तोबा गर्दी : सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

एरंडोल – प्रतिनिधी Erandol

येथील ग्रामीण रूग्णालयात लस उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच लसीकरण केंद्रावर अलोट गर्दी झाली. ही गर्दी एवढे होती की, जणू काही नागरीक कोरोनाला विसरूनच गेले की काय? असे या गदीतून दिसते. नागरीकांनी केलेली गदी बघता सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे या गोंधळावरून प्रशासकीय यंत्रणेचा नियोजन शुन्य कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

येथील ग्रामीण रूग्णालयात लसीकरणासाठी जाण्यासाठी नागरीकांना त्रास होत असल्याने शहरातील दि.शं.पाटील महाविद्यालयात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी असलेले मोकळे मैदान बघता नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

यापुढे टोकन पध्दतीने लसीकरण होणार लसीचा तुटवडा व काही दिवसांची प्रतीक्षा यामुळे एरंडोल ग्रामीण रूग्णालयात लस टोचून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. दि.६ मे रोजी ७०० लसीचे डोस उपलब्ध असल्याने सातशे नागरीकांना लसीकरण करण्यात आले. यापुढे टोकण पद्धतीने लसीकरण करण्यात येणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास पाटील यांनी माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या