Video : पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश; अखेर ‘ते’ वडाचे झाड वाचले

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्रिमूर्ती चौक ते मायको सर्कल येथील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी (Flyover) नाशिकमधील उंटवाडी पुलालगतचे वडाचे झाड तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मुद्द्यावरून सकाळपासून नाशकात वातावरण तापले होते. वडाच्या झाडाच्या तोडण्यावरून पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती…

सकाळपासून हे झाड वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी आंदोलन सुरु केले होते. तसेच सोशल मिडियावरदेखील (Social Media) वृक्षतोडीवर आवाज उठविण्यात आला.

पर्यावरणप्रेमींनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना निवेदन पाठवले होते. या निवेदनाची दखल घेऊन पर्यावरणमंत्र्यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.

प्रस्तावित उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करण्याची सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामुळे २०० वर्षांपूर्वीचे हे वडाचे झाड आणि झाडाखाली असलेले मंदिर वाचले असल्याने पर्यावरणप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला आहे. पाहा काय म्हणताय पर्यावरणप्रेमी…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *