Friday, April 26, 2024
HomeUncategorizedVideo Story : दे ढिल काट है....च्या गरात नंदनगरीत पतंगोत्सवाचा आनंद

Video Story : दे ढिल काट है….च्या गरात नंदनगरीत पतंगोत्सवाचा आनंद

नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar

दे ढिल काट है…. च्या गजरात डीजे आणि ध्वनीक्षेपकाच्या प्रचंड निनादात नंदनगरीत भल्या पहाटे पतंगबाजांचा उत्साह सळसळतांना दिसून आला. कोरोनाच्या कटूतेवर मकरसंक्रांतीच्या तीळगुळाचा गोडवा आल्याने नागरिक काही काळ का असेना कोरोनाला विसरतांना दिसले.

- Advertisement -

नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेवर वसला असल्याने गुजरात राज्यातील सर्वच सण उत्सवांचा जिल्हयावर प्रभाव असतो. नवरात्रौत्सव, कृष्णजन्माष्टमी या सणांपाठोपाठ गुजरात राज्यात मकरसंक्रांत अर्थात पतंगोत्सव मोठया प्रमाणावर साजरा केला जातो.

अर्थातच नंदुरबार जिल्हयातही हा सण उत्साहात आणि व्यापक स्वरुपात साजरा केला जातो. या सणाची वाट अबालवृद्ध महिनाभरापासूनच पाहत होते. यासाठी ठिकठिकाणी पतंग, मांजाची दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठेला यात्रौत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते. पतंग उडविण्यासाठी मांजा आवश्यक असतो.

हा मांजा तयार करण्यासाठीही तरुणांची लगबग दिसून येत होती. विविध रंगीबेरींगी पतंगदेखील विक्रीसाठी उपलब्ध होत्या. गो कोरोना गो, पंतप्रधान मोदी, छोटा भिमचे चित्र अशा विविध पतंग  लक्ष वेधून घेत होत्या. बाजारपेठेत एक रुपयापासून १०० रुपयांपर्यंत किमतीच्या पतंग उपलब्ध होत्या.

मकरसंक्रांतीला भल्या पहाटे नंदनगरीत डीजे, ध्वनीक्षेपक, बँडपथक लावून दे ढिल काट है च्या गजरात अबालवृद्धांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला. हा आनंद लुटण्यासाठी महिलादेखील मागे नव्हत्या. नंदनगरीत घराघराच्या गच्चीवर सर्व कुटूंब, मित्र, मैत्रिणी एकत्र येवून डिजेच्या तालावर नाचतांना दिसून आल्या. यासोबतच गच्चीवर नाश्ता, चहा, भोजनाची व्यवस्था असल्याने आनंद द्विगुणीत झालेला दिसवून आला.

गेल्या दहा अकरा महिन्यांपासून देशावर कोरोनाचे सावट असतांना आता काही प्रमाणात बाजारपेठा खुलू लागल्या आहेत. त्यातच मकरसंक्रांतीचा सण आल्याने कोरोनाच्या कटुतेवर तीळगुळाचा गोडवा आल्याने नागरिक कोरोनाचे दुःख विसरतांना दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या