Video : ...म्हणून बिघडलं पोळ कांद्याचं समीकरण, पाहा देशदूतचा खास Ground Report
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात वर्षातून किमान दोन ते तीन वेळा कांद्याचे पिक घेतेले जाते. त्यामध्ये लाल कांदा (पोळ कांदा), उन्हाळी कांदा आणि रांगडा कांदा असे प्रकार आढळतात. सध्या लाल कांद्याची शेवटची काढणी सुरु आहे...
शेतकऱ्याला हे पिक काढण्यासाठी काय-काय कष्ट करावे लागतात ? कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते या सर्व बाबी सर्वांना कळाव्यात यासाठी देशदूतने थेट शेतकऱ्यांचे शेत गाठत वास्तव समजून घेतले आहे.
लाल कांदा हा प्रामुख्याने हिवाळा सुरु होताच काढायला सुरुवात होते. साधारण दिवाळीनंतर शेतातील कांदा बाजारसमितीत चमकू लागतो हे नेहमीचेच समीकरण आहे, मात्र यंदा पाउसाळा लांबला असल्याने ऋतूचक्राबरोबरच शेतीचक्रही विस्कळीत झाले आहे.
याचा फटका शेतकऱ्याच्या अर्थचक्राला बसला आहे. यातून लाल कांद्याचे समीकरण बिघडले आहे. मंगरूळ गावात याविषयीचा आढावा घेतला असता, तेथील शेमजुर आणि शेतकरी यांनी माहिती दिली की, लाल काढा काढणे सुरु असले तरी तो कांदा साठवता येत नसल्यामुळे तो लगेच बाजारात पाठवावा लागतो. मात्र त्याला भाव कमी आहे.
खर्च ज्या प्रमाणात झाला त्या तुलनेने भाव मिळत नाही. कांदे लागणीपासून ते काढणीपर्यंत मोठ्याप्रमाणात खर्च होतो. त्याप्रमाणात उत्पन्न मिळत नाही अशी परिस्थती सध्या लाल/पोळ कांदा उत्पादकांची झाली आहे.