Video कुटुंबाच्या दुराव्या पेक्षा कामाचा आनंद मोठा !

जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांनी व्यक्त केल्या भावना
Video कुटुंबाच्या दुराव्या पेक्षा कामाचा आनंद मोठा !

धुळे । प्रतिनिधी Dhule

कोरोना रुग्णांची सेवा करताना आपल्या मूलं बाळापासूनही बऱ्याचदा दूर राहावे लागते. पण यांची खंत बाळगण्यापेक्षा आपल्याला सेवा करता येते, याचा आनंद मोठा आहे. अशा भावना धुळ्यातील जुन्या जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्यात.

आता मागील वर्षी इतकी भीती राहिलेली नाही, पण खबरदारी दुप्पटीने वाढली आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील आता याचे गांभीर्य कळू लागले आहे. रुग्णांचा जीव वाचविता येतोय, याचे समाधान सगळ्यात मोठे आहे. बरेच जण आमचा कोरोनाचा योद्धा म्हणून सत्कार करतात, हेही आनंददायी आहे. परंतु सत्कारापेक्षा वेळेवर पगार होणे जास्त महत्वाचे आहे कारण आमचा उदरनिर्वाह यावरच अवलंबून आहे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com