Video धुळ्यात आता प्लाझ्मा साठीही होतेय लूट

Video धुळ्यात आता प्लाझ्मा साठीही होतेय लूट

सचिन शेवतकर, कल्पेश शर्मा यांनी केली कारवाईची मागणी

धुळे ।प्रतिनिधी Dhule

कोरोनाची महामारी काहींसाठी पैसे लुटण्याची संधीच बनली असून सर्वसामान्य जनतेच्या मजबुरीचा कसा उघडपणे फायदा घेण्यात येत आहे , याचे रोज नवीन प्रकरणे उघड होत आहेत. रेमडेसीविर, बेड च्या नावाने लूट सुरू असताना आता प्लाझ्माच्या नावाने लुटण्याचे गोरख धंदे सुरू झाले आहेत.

कोरोनवर रामबाण उपाय असल्याचे सांगून आता पर्यंत रेमडेसीविर या इंजेक्शन चा काळाबाजार करून लुटण्यात आले. यावर आवाज उठविल्यानंतर आता काही प्रमाणात यात फरक पडला असला तरी अद्याप हे प्रकार पूर्णपणे थांबलेले नाही.

मध्यंतरी बेड शिल्लक नाही म्हणूनही काही खाजगी हॉस्पिटल्स कडून लुटण्यात आले. काहींनी अमाप बिले उकळलीत. याबाबत अनेक तक्रारी होऊन संबंधितांवर कारवाई देखील झाली.

कोरोनाचा बाधित रुग्ण लवकर बरा होण्यासाठी प्लाझ्मा देण्यात येते. वाढत्या रुग्णांची ही निकड बघून धुळ्यातील काही रक्त पेढ्यानी आता याचा गोरख धंदा सुरू केला आहे.

शासनाच्या रक्त संकलन परिषदेने प्लाझ्माच्या एका पिशवीचे दर 5500 रुपये एवढे निश्चित केले आहे. मात्र यासाठी सरसकट 10 हजार रुपये घेतले जात आहेत. विशेष म्हणजे प्लाझ्मा डोनेट करण्याचा आग्रह धरला जात असून असे डोनेट करून देखील रक्तपेढीने ऍडव्हान्स घेतलेले दहा हजार रुपये परत केले जात नाहीत.

या संदर्भात भाजपाचे महानगर उपाध्यक्ष तथा भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत समितीचे सदस्य सचिन शेवतकर यांनी शहरातील एका रक्तपेढीवर स्ट्रिंग ऑपरेशन करून याबाबतचा भांडाफोड केला आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांनाही प्रत्यक्ष भेटून ही कैफियत मांडली आहे. आधीच कोरोनाची बेजार झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची लूट थांबली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com