Video खान्देशनी आखाजी ; अहिराणी गीतं

प्रा.बी.एन.चौधरी, धरणगाव यांनी अक्षय तृतीया बद्दल सांगितलेली माहिती व गायीलेली गाणी
Video खान्देशनी आखाजी ; अहिराणी गीतं

धरणगाव - Dharangaon

अक्षय्य आनंद देणारी आखाजी म्हणजे ‘अक्षय्य तृतीया’ हा दिवस म्हणजे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया आहे. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. अक्षय्य तृतीयेलाच खान्देशात आखाजी म्हणून संबोधले जाते. येथे सासूरवाशिणीला माहेरचा अक्षय आनंद देणारी म्हणून अक्षय्य तृतीया ओळखली जाते. याविषयीची माहिती व खान्देशात म्हटली जाणारी झोक्यावरील अहिराणी गाणी...

जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक जिल्ह्याचा काही भागात प्रामुख्याने अहिराणी बोली भाषा आहे. या अहिराणीत आखाजी विषयी अनेक गीतं आहेत. या गीतातून खान्देशातील संस्कृती, जनजनीवन, कुटूंब व्यवस्था, सासर-माहेर, नातेसंबंध यांचे असंख्य पदर उलगडून जातात. सासूरवाशिणीला माहेरचा अक्षय आनंद देणारी म्हणून अक्षय्य तृतिया ओळखली जाते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com